|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||

श्रीरामवरदायिनी देवीचे स्रोत

	

देखिली तुळजा माता । निवालो अंतरी सुखे ॥ तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला ॥ १ ॥ आघात संकटे वारी । निवारी दुष्ट दुर्जन ॥ संकटी भरवसा मोठा । तत्काळ काम होतसे ॥ २ ॥ सर्वही बालके जिची । त्रैलोक्य जननी पहा ॥ साक्षिणी सर्व लोभाळू । मर्यादा कोण रे करी ॥ ३ ॥ सर्वांची मूळ हे माया । मूळमाया म्हणोनिया ॥ सृष्टीची आदिशक्ती हे । आदिशक्ती म्हणोनिया ॥ ४ ॥ राम उपासना आहे । हे रामवरदायिनी ॥ सख्य ते चालते सर्वे । प्रवृत्ती-निवृत्तीकडे ॥ ५ ॥