|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||

कार्यक्रम जत्रा

जत्रा आणि उत्सव

आदिमाया शक्ती श्री रामवरदायिनी देवीची जत्रा वर्षातून एक वेळा भरते. वार्षिक यात्रोत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होते यात्रेच्या आधीच आसपासच्या गावांमधून मातेला केलेला नवस पूर्ण झालेले बगाड म्हणजे लाट, सासनकाठी, साठी एक प्रमुख योग्य ऊंची असणारे सरळ आणि मजबूत झाड, आईनं, साग निवडले जाते गावातील सुतार मंडळी यांसकडून या गोष्टी ची खात्री झाल्या नंतर जत्रेच्या दिवशी प्रातःकाळी सुतार मंडळी त्या निवडलेल्या झाडावर कोरीव काम करुन सुबक अशी (लाट, बगाड ) बनवतात.

याच दरम्यान गावातील पुरुष वर्ग मोठया संख्येने सनई ताशा च्या मंगलमय आवाजात नाचवत पायी अनवाणी पायाने ही लाट देवीच्या मंदिराच्या समोरच्या जागेवर ठेवतात . मुख्य सभा मंडपामागे असलेल्या एक प्राचीन खरखांब, यावर नियोजित वेळीच गावातील, व यात्रेनिमित्त आलेले इतर शेकडो भाविक त्या पवित्र लाटेला पुजून गाऱ्हाणे बोलून देवीच्या नावाचे चांगभलं करुन नाचवत पटांगणातून ही लाट खरखांब असलेल्या ठिकाणी घेऊन येतात आणि तरुण पुरुष मंडळी लाट आपल्या खांद्यावर घेऊन 30फूट उंच असणाऱ्या लाकडाच्या गोफेवर ठेवतात नंतर वरिष्ठ सुतार मंडळी एक विशेष प्रकारचे पारंपरिक शस्त्र आपल्या पाठीवर परिधान करुन 5 फेऱ्या घड्याळातील सुई च्या दिशेने फिरवतात, पूर्वीचा काळी हे शस्त्र (गळ)ते आपल्या पाठीवर रुतवून ठेवायचे आणि यातून कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत नसे.

या नंतर देवीचे हजारो भाविक मंदिराच्या दिशेने येऊ लागतात पारंपरिक धोतर, फेटा,कपाळी गुलाल, स्त्रिया नऊवारी साडी, नेसून तो नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी उत्सूक असतात, जसा पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवतो त्याचप्रमाणे या यात्रेला सुरवात होते, पूर्वीचा काळी साधारण एक शतक वर्षा पूर्वी ह्या तालुख्यतील 15 गावांचे ग्रामदैवत या यात्रेला उपस्थित असायचे, येणाऱ्या ग्राम दैवतांच्या भेटी,ओटी, मानपान झाल्या नंतर त्या देवतांना मानाने मंदिरात स्थानापन्न केले जाते, त्यानंतर येणाऱ्या गावातील सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावर बोलवून त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला जातो, त्या व्यक्ती आपले मत व्यक्त करतात देवीचा त्यांच्या स्मुतीतील महिमा सांगतात, त्यानंतर, गावातील थोर वयोवृद्ध प्रतिष्ठित व्यक्ती देवीचा महिमा, मंदिराची माहिती, मंदिराच्या मार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक क्रीडात्मक कामांची माहिती देतात, छबिना त्याची परंपरा आणि क्रम सांगतात, दिलेल्या क्रमाने ग्रामदैवतांच्या पालख्या ढोल ताशा सनई चा गजरात मंदिराच्या तीन प्रदक्षिणा घालून मंदिरात स्थानापन्न होतात, याचवेळी महाराष्ट्राचे लोकनाट्य म्हणजेच तमाशा सुरु होतो आधी गाणं मग गवळण त्यानंतर पारंपरिक वघ गायला जातो, या वेळी आलेले भाविक देवीचे दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणात देवीला नवस बोलून नवस फेडून देवीचा प्रसाद लाडू, देवीच्या प्रतिमा, अल्पोआहार घेण्यासाठी शेजारीच असणाऱ्या दुकानात गर्दी करतात, आशा रीतीने दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक या यात्रेला भेट देतात आणि ही आदिमाया शक्ती रामवरदायिनी माता त्या असंख्य भक्तांच्या नवसाला पावते