|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||

चौदा वर्षाच्या वनवासात प्रभू रामचंद्र सितेचा शोध घेत विरही अवस्थेत फिरत असताना, सती पार्वतीला प्रभू रामचंद्रांची परिक्षा घेण्याची लहर आली.
पार्वतीनं सितेचं रुप घेतलं आणि ती प्रभू रामचंद्रासमोर उभी राहून म्हणाली, "नाथ, आपण विरहानं व्याकुळ होऊन, माझा शोध कशाला घेता? मी तर इथेच आहे.
" प्रभू रामचंद्रांनी क्षणातच सती पार्वतीला अंतर्मनानं ओळखलं, आणि ते म्हणाले, "माते, मी तुला ओळखलं, तू माझी प्रिय ‘सिता’ नसून तू आदिशक्ती सती पार्वती आहेस, साक्षात माझी माता आहेस.
" पार्वती प्रसन्न झाली, आणि तिनं प्रभु रामचंद्रांना आशिर्वादपर वर दिला. "रामा, तुझी लाडकी सिता तुला भेटेल. ती निष्कलंक आहे. आणि तुझ्या हातूनच रावणाचा वध होईल. रावणांचं १४ चौकडयांचं राज्य नष्ट होईल. शेवटी तुझाच राज्याभिषेक होईल".
प्रभु रामाला असा वर देणारी ती ‘रामवरदायिनी’...!
कुलदेवता श्रीरामवरदायिनी हिचेबद्दल निरनिराळया आख्यायिका आहेत.

देवळाचे मुख्य प्रवेशद्वार

श्री रामवरदायिनी मंदिर (चोरवणे), तालुखा खेड, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र

भारत देशाच्या संतांच्या भूमीत,कोकण किनारपट्टीतील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हातील खेड तालुखा आणि त्यातील, पवित्र वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानी, स्वयंभू नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत, चोरवणे गाव आणि आणि या गावाचे ग्रामदैवत शिंदे घराण्याचे आदिदैवत असलेले श्री रामवरदायिनी मातेचे मंदिर एक रत्नागिरी जिल्हातील श्रद्धास्थान आहे.

त्रेतायुगा मध्ये रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते. त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणली,"राम सीतेच्या शोधात फार व्याकूळ झाले आहेत, त्यांची ती अवस्था मला पहावत नाही, तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते, जेणेकरून ते ह्या दु:खातून सावरतील".

तेव्हा शंकर म्हणाले "तसे काही करू नकोस ते तुला ओळखतील, ते परम पुरुष असून, एकवचनी, एकबाणी आहेत. शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत.

पुढे वाचा

रामवरदायिनी विशेषरामवरदायिनी माता आणि शिंदे घराण्याची राजमुद्राजुना खरखांबदेवीचे शिपाईप्राचीन तांब्रपट

रामवरदायिनी विशेष व्हिडिओश्रीराम वरदायिनी देवी आपले रूप प्रकट करताना -तिसंगी गावच्या यात्रेतश्री राम वरदान देवी आपले रूप प्रकट करताना.. भोम यात्रा चिपळूणचोरवणे गावची ग्रामदेवता श्रीराम वरदायिनी देवी आपले रूप प्रकट करताना पोसरे गावातखेड - राष्ट्रप्रेमाचे जाज्वल्य उदाहरण दर्शवणारी कहाणी;लहान वयात हुतात्मा झालेले कृष्णा गणू शिंदेआई तुझ्या दर्शनाला आलो। रामवरदायिनी देवीअदिशक्ती श्री रामवरदायिनी देवी पालखी ( मु.पो.चोरवणे जिःरत्नागिरी ताःखेड )