|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||
भारत देशाच्या संतांच्या भूमीत,कोकण किनारपट्टीतील निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हातील खेड तालुखा आणि त्यातील, पवित्र वाशिष्ठी नदीच्या उगमस्थानी, स्वयंभू नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत, चोरवणे गाव आणि या गावाचे ग्रामदैवत शिंदे घराण्याचे आदिदैवत असलेले श्री रामवरदायिनी मातेचे मंदिर रत्नागिरी जिल्हातील श्रद्धास्थान आहे.
त्रेतायुगा मध्ये रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते. त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणली,"राम सीतेच्या शोधात फार व्याकूळ झाले आहेत, त्यांची ती अवस्था मला पहावत नाही, तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते, जेणेकरून ते ह्या दु:खातून सावरतील". तेव्हा शंकर म्हणाले "तसे काही करू नकोस ते तुला ओळखतील, ते परम पुरुष असून, एकवचनी, एकबाणी आहेत. शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत. परंतु पार्वतीला त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही., तिने सीतेचे रूप घेतले आणि श्रीरामासमोर प्रकट झाली, श्रीरामाला म्हणाली "नाथ! आपण का इतके का व्याकूळ झालात, मी तर इथेच आहे, तेव्हा माझा स्वीकार करा". परंतु प्रभूरामचंद्राने पार्वतीला ओळखले, आणि त्या सीतेच्या रूपातील पार्वतीला म्हणाले, ’माते! तू कशाला एवढे कष्ट घेतलेस आणि इकडे आलीस?". तेव्हा पार्वतीने आपले मूळ रूप प्रकट केले आणि श्रीरामाला वरदान दिले की, "ज्या कार्यासाठी आपण जन्म घेतलात, ते कार्य सफल होईल". तेव्हा रामाने पार्वतीला विनवले, ’देवी! तू एवढे कष्ट घेतलेस आणि ह्या जागी आलीस, तर तू या जागेवर ’श्रीरामवरदायिनी’ नावारूपाने रहा आणि भक्तांचे कल्याण कर’, तेव्हा पासून श्रीरामवरदायिनी देवीचे जागृत देवस्थान या गावामध्ये आहे.
श्री सुरेश रामजी शिंदे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई (मर्या.)
ई मेल : suresh@nfplonline.com
फोन :९९६७६८९७४५