|| पुरातन कालीन श्री रामवरदायिनी मंदिर चोरवणे ||
प्राचीन मंदिराची बांधणी
आपणास हे मंदिर अतिशय सुंदर दिसते, परंतु त्यामागे फार मोठा इतिहास आहे आणि तो जाणून घेणं देखील तितकच महत्वाचे आहे मंदिर बांधणी कोणत्या पद्धतीने करावी हे फार मोठे कोडे होते, परंतु देवीने कौल देऊन पाशाणी पुरातन काळी पद्धतीनेच बांधावे असे सांगितले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत मंडळी एकत्र येऊन इतिहास मंदिरांना भेटी चे कार्यक्रम सुरु झाले, अखेर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील वयोवृद्ध शिल्पकार कैलासवासी पाथरूड यांनी या कामासाठी सहमती दर्शवली आणि यांच्या कल्पनेतून या मंदिराची पायाभरणी झाली. मंदिर हेमांडपंथीय असून मंदिरासाठी लागणार दगड कोल्हापूर, निपाणी (कर्नाटक)येथील प्रमुख खाणीतून आणण्यात आला, मंदिराची जागा 35गुंठे असून गाभारा 15×15, कळस 40 फूट उंच , पालखी आसन 25×11, झोलाई, मानाई वाघजाई गाभारा 13×13, सभा मंडप 25×30, जोते 4फूट, गाभाऱ्यातील जोते 6 फूट उंचीचे आहे, मुख्य प्रवेशद्वार 10 फूट रुंद आणि 24 फूट उंच पाषाणी नक्षीदार आहे,दक्षिण द्वार 14 फूट उंच आहे, सदर मंदिराला 4 फूट उंची असलेली तटबंदी आहे, मंदिराचे भूमिपूजन 108 नीलकंठ शिवाचार्य महास्वामी आदीमठाध्यक्ष धारेश्वर महाराज पाटण जिल्हा सातारा यांच्या शुभहस्थे कार्तिक कृ षष्ठी 1929 गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर 2007 रोजी झाला
वैदिक पूजा हवन
मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळा, त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठापना या निमित्त गण होम, रुद्र चंडी होम हवन, कळस रोहन विधि यान सारख्या अनेक वैदिक पूजा केल्या गेल्या.
श्री सुरेश रामजी शिंदे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई (मर्या.)
ई मेल : suresh@nfplonline.com
फोन :९९६७६८९७४५